Punashcha (पुनश्च : डिजीटल मराठी नियतकालीक) 5.8.1 Icon

Punashcha (पुनश्च : डिजीटल मराठी नियतकालीक)

kiran vasant bhide News & Magazines
4.4
42 Ratings
5K+
Downloads
5.8.1
version
Jul 23, 2018
release date
2.6 MB
file size
Free
Download

What's New

Privacy Policy Link in Menu

Privacy Policy in App Store

About Punashcha (पुनश्च : डिजीटल मराठी नियतकालीक) Android App

मराठी भाषेत असंख्य छापील नियतकालीके आहेत. काही ऑनलाइन वेबसाइट वर देखील उपलब्ध आहेत. काही वर्तमानपत्र किंवा लेखांच्या वेबसाइटची मोबाइल ऍप देखील आहेत ज्यातून वेबसाइटच आहे तशी दिसते. मराठी वाचकांना प्रतीक्षा होती स्वतंत्र अशा मोबाइल ऍपची ज्यावर निवडक लेख मोबाइलवर थेट वाचता येउ शकतील. शिवाय ते इंटरॅक्टीव्ह असायला हवे. होतकरू लेखकांना त्यावर आपले लेख प्रसीद्ध करून लोकांपर्यंत पोहोचवताही आले पाहीजे. ह्यातून सुरू झाला पुनश्च चा प्रपंच...

श्री. किरण भिडे ह्यांच्या कल्पनेने www.punashcha.com ह्या संकेतस्थळाच्या माध्यमातून आणि त्याला संलग्न अशा ऍन्ड्रॉइड मोबाइल ऍपच्या माध्यमातून ही किमया साध्य केली आहे. सदरील साइटवर वार्षीक सभासदत्वाचा पर्याय उपलब्ध असून पेमेंट गेटवेच्या माध्यमातून १००% ऑनलाइन सभासदत्व घेता येते. सशुल्क सभासदांनाच निवडक लेख वाचता येतात. नि:शुल्क सभासदांसाठी देखील अवांतर व संपादकीय विभागात लेख उपलब्ध असून त्यावर प्रतिक्रीया द्यायची सोय उपलब्ध आहे. लेख प्रसारित केल्यावर तुम्हाला मेलवर आणि मोबाईल वर त्याचं नोटिफिकेशन येईल. मग तुम्हाला वेबपोर्टल वर जाऊन किवा ऍप उघडून तो लेख वाचता येईल, आवडला तर वॉट्सऍप आणि फेसबुकवर तो शेअर करता येईल...

लेखक हा घटक या पूर्ण वाचनव्यवहारामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो. कारण खरंतर त्याचं लिखाण हेच मुख्य प्रोडक्ट असतं. पण आत्तापर्यंत असं कुठलंच मॉडेल बनलेले नाही ज्यातून लेखकाला जास्तीत जास्त पैसे मिळणे शक्य होईल. ‘पुनश्च’ हा असा पहिलाच प्रयत्न आहे ज्यात लेखकाच्या एखाद्या लेखाच्या वाचकप्रियतेवर त्याचे मानधन देणे शक्य होईल. हे सर्व तुमच्या सहभागाशिवाय होणे अशक्य आहे. लेखक तसा स्वान्त सुखाय लिहित असतो पण वाचकाच्या सहभागाने त्या लेखनाला पूर्णत्व येते. तो सहभाग त्या लेखाबद्दलचे स्वतःचे मत लेखकाकडे आणि आपल्या ओळखीच्या लोकांकडे व्यक्त करून दाखवता येतो. आपण सर्व सुजाण वाचक जास्ती जास्त सहभागाने पुनश्च चा हाही हेतू सफल कराल याची खात्री आहे...

पुनश्च या वेबपोर्टल व मोबाइल ऍप च्या माध्यमातून आपल्या सभासद वाचकांना दर बुधवारी आणि शनिवारी असे आठवड्यातून दोन लेख वाचावयास मिळतील. वर्षभरात साधारण १०४ लेख वाचता येतील. मराठी ललित लेखनाचे आम्ही ढोबळमानाने ८ प्रकार केले आहेत :
१. अनुभवकथन
२. चिंतन
३. व्यक्ती/संस्था परिचय
४. कविता/पुस्तक/चित्रपट/कला रसास्वाद
५. अर्थकारण/ राजकारण/ समाजकारण ( धर्म/अध्यात्म, जाती, अंधश्रद्धा, महिला इ. )
६. कथा, स्वमदत लेख, स्थललेख, मृत्युलेख, उद्योग
७. आरोग्य/ शिक्षण/ पर्यावरण/ पालकत्व/ खेळ/ मराठी भाषा
८. खुला ( प्रासंगिक, मन/ मेंदू/ विज्ञान/ तंत्रज्ञान इ. मधील संशोधन वगैरे )

ब-याचदा वॉट्सऍप किंवा फेसबूकवर आलेला एखादा लेख आपल्याला खूपच आवडतो. पण पुन्हा वाचायचा म्हटलं तर कुठे शोधायचा? असेच आवडलेले वेगळे लेख आम्ही पुनश्चवर संकलीत करत आहोत. जर तुमच्याकडे असे लेख असतील तर "सभासद होउन", लेख थेट अपलोड करा. 'आपली आवड जुळलेले लेख' कायमस्वरूपी जतन केले जातील व सर्चच्या माध्यमातून "पुनश्च" उपलब्ध होतील.

English Note : Punashcha is 1st Marathi Digital Mobile Magazine with Paid Subscription Facility for this generation mobile readers. This revolutionary concept is not just collection or articles but a sincere, organized approach to ensure long-term benefit of author depending upon popularity or literature!

Other Information:

Package Name:
Requires Android:
Android 4.0.3+ (Ice Cream Sandwich MR1, API 15)
Other Sources:

Download

This version of Punashcha (पुनश्च Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.

Variant
50801
(Jul 23, 2018)
Architecture
Unlimited
Minimum OS
Android 4.0.3+ (Ice Cream Sandwich MR1, API 15)
Screen DPI
nodpi (all screens)
Loading..