Added Support for Latest Android Versions
Bug Fixes
‘महात्मा फुले नोकरी SMS सुविधा आणि कन्सल्टन्सी’ हि संस्था पूर्णतःहा नोंदणीकृत आहे. हि संस्था १ मे २००९ पासून ‘महाराष्टदिन’ या दिवसी निमित्त राखून कार्यान्वित केली आहे. ज्या प्रमाणे १ मे ‘महाराष्टदिन’ दिवसी आपल्या करिता नोकरी SMS सुविधा घेऊन आलोत, त्याच प्रमाणे १५ ऑगष्ट २०१६ “स्वतंत्रता दिवस” या निमित्ताने आम्ही आपल्या करिता ‘नोकरी सुविधा’ या नावाने Mobail App घेऊन आलो आहोत , या App च्या माध्यमातून आम्ही आपल्याला पहिल्या पेक्षाही उत्तम प्रकारची सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहोत’ ज्या प्रमाणे नोकरी SMS सुविधेला आपण उत्तम प्रतिसाद दिला त्याच प्रमाणे ‘नोकरी सुविधा’ App ला सुद्धा प्रतिसाद द्याल अशी अपेक्षा करायला हरकत नसावे. ही संस्था गरजु विद्यार्थ्यांना/व्यावसायीकांना वेळोवेळी विद्यार्थ्यांना नोकरीची माहिती तसेच व्यावसायीकांना व्यवसाय वाढविण्या करिता अगदी निस्वार्थपणे अत्यंत अल्पदरात ‘ना तोटा ना नफा’ या नुसार SMS च्या माध्यमातून सेवा देत आहोत. आणि आता ‘नोकरी सुविधा’ या App च्या माध्यमातून सेवा देणार आहोत. विद्यार्थी/व्यावसायिक मित्रांनो ज्या प्रमाणे आपणास मनुष्य-जन्म, आई-वडील, प्राण-वायू फुकट मिळतो त्याच प्रमाणे आम्ही आपल्याला अत्यंत अल्प दरात हि सुविधा देणार आहोत, म्हणून त्यांना कमी लेखाल तर ती खूप मोठी चूक ठरेल. सध्या स्थितीचा विचार केला तर आज पर्यंत आम्ही ७०,००० विद्यार्थी आणि १७,००० व्यावसायिकांना सुविधा देत आहोत. परंतु बदलत्या काळाचा विचार करता, आणि SMS च्या मध्यमातून सेवा देतानी वेळोवेळी येत असलेल्या अडचणी आणि मर्यादा लक्षात घेता, आम्ही आपल्या सेवेस ‘नोकरी सुविधा’ App च्या माध्यमातून सेवा देण्याकरिता विचार केला आहे. जसे आपल्या देशाला विशेषतः महाराष्ट्राला लाभलेले “महात्मा ज्योतिबा फुले ” त्याच बरोबर “माता सावित्री बाई फुले” यांनी शिक्षणा करिता आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले आहे, याच महान मानवास नतमस्तक होऊन, आम्ही यांच्या आचार-विचारांवर पूर्णतः प्रेरीत होऊन आपल्या करिता संपूर्ण आयुष्य पणाला लावण्याचा निर्धार आम्ही करीत आहोत. ‘नोकरी सुविधा’ या Mobail App च्या माध्यमातून आम्ही आपल्याला (सरकारी नोकरी/खाजगी नोकरी/ MPSC /UPSC /ITI /Clerk /Talathi/ Army /SRP /CRPF /Banking/ Railway /Police Bharti) या प्रकारची सेवा देणार आहोत. तसेच त्याच बरोबर भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील वेळोवेळी होणाऱ्या स्पर्धा परीक्षाचे पेपर संच /Anser Key/ अॅडमिट कार्ड/ निकाल/ प्रवेश/ चालू घडामोडी/ यशस्वी व्यक्तींची यशस्वी गाथा तसेच महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक इतिहास इत्यादी प्रकारची माहिती देणार आहोत. त्याचप्रमाणे व्यावसायिक बंधूंना आपला व्यवसाय वाढविण्याकरिता एक खारीचा वाटा प्रमाणे आपल्या संबंधित व्यवसाय करिता योग्य तेवढी माहिती आम्ही आपल्याला ‘नोकरी सुविधा’ या App च्या माध्यमातून देणार आहोत. अलीकडच्या काळात वाढलेली बेरोजगार आणि व्यावसायिकांना येणारी बाजारात मंदी वाढलेली आहे. ती पूर्णतः नाही परंतु काही का प्रमाणात का होईना नक्कीच कमी करण्याचा प्रयत्न आम्ही या सेवेच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करणार आहोत. पृथ्वी तालावरील प्रत्येक मनुष्य हा बुद्धिमान असतो, परंतु गरज असते ती त्याचे बुद्धिमान व्यक्तिमत्व चांगल्या मार्गदर्शनाने खुलवण्याची. नेमकी हीच परिस्थिती आमच्या विद्यार्थी तसेच व्यावसायिक बंधूंची आहे. त्याच गोष्टीचा आम्ही विचार करून कमी-अधिक प्रमाणात का होईना आपल्याला मार्ग दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. केवळ याच विचाराने आणि या पृथ्वी तलावरील सर्वात समृद्ध म्हणजे अध्यात्मिक, वैचारिक व उत्कृष्ट विविधतेने नटलेल्या आपल्या भारतमातेच्या कुशीत विराजमान असलेले व आज पर्यंतच्या भारतीय संसदेच्या इतिहासातील सर्वात महान, निस्वार्थी, दूरदृष्टी सहानुभुती, प्रेम आणि चांगले मार्गदर्शन देणारे व सर्व जगाला ‘हे विश्वची माझे घर’ या संकल्पनेला धरून चालणारे महान व्यक्तिमत्व लाभलेले पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘डिजिटल इंडिया’, ‘स्वच्छ भारत, ‘समृद्ध भारत’, ‘पढेगा इंडिया तो बढेगा इंडिया’ आणि सब का साथ, सब का विकास’ या अभियानाने प्रेरीत होऊन या देशातील विद्यार्थी मित्रांनो तसेच व्यावसायिक बांधवांना आमची सेवा देण्याचा खारी सारखा प्रयत्न या ‘महात्मा फुले नोकरी SMS सुविधा आणि कन्सल्टन्सी’ या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. असे समजा कि हि संस्था याच करिता आम्ही सुरु केलेली आहे. या परीचयाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला निवेदन करतो कि, आपण हि ‘नोकरी सुविधा’ App ची सुविधा आपण आपल्या मोबाईल वर सुरु करावी. आणि आपल्या मित्रांना/ नातेवाईकांना आणि आपल्या संपर्कातील इतर विद्यार्थ्यांना सुरु करण्याकरिता सांगावे,
This version of Naukri Suvidha नोकरी सुविधा Android App comes with one universal variant which will work on all the Android devices.
If you are looking to download other versions of Naukri Suvidha नोकरी सुविधा Android App, We have 7 versions in our database. Please select one of them below to download.